Raj Thackeray
Raj Thackeray

"राज्य एकदा माझ्या हातात द्या, सगळे भोंगे बंद करुन टाकतो"; राज ठाकरे कडाडले

मशिदींवरील भोंग्यावरून मनसेनं पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

मशिदींवरील भोंग्यावरून मनसेनं पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांना संबोधीत केलं. यावेळी ठाकरेंनी महायुती सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले, राजकारणात सध्या दुसऱ्याची मुलं कडेवर खेळतात. मला माझीच मुलं कडेवर खेळवायची आहेत. मनसेने प्रत्येक आंदोलन सुरु करुन त्याचा शेवटही केला. समुद्रात दर्गा बांधत होते आम्ही बंद पाडला. दर्गा होतोय हे सरकारच्या लक्षात का आले नाही. मनसे एवढी आंदोलनं कोणत्याही पक्षानं केली नाही. माझ्या सहकाऱ्यांनी आंदोलन केलं, लाठ्या काठ्या खाल्ल्या, केसेस घेतल्या. तुमच्या सगळ्यांतच्या कष्टामधून हे राज्य एकदा माझ्या हातात द्या सगळे भोंगे एकसाथ बंद करुन टाकतो, असं आवाहनही राज ठाकरेंनी जनतेला केलं आहे.

मनसे कार्यकर्त्यांना संबोधीत करताना ठाकरे पुढे म्हणाले, सोशल मीडिया आपण कशा प्रकारे वापरला पाहिजे, राजकरणासाठी याचा कसा वापर केला पाहिजे, हे तपासा. सोशल मीडियाचा वापर लोकांपर्यंत पोहचण्यासाठी करा. राजकीयदृष्ट्या सोशल मीडियाचा वापर करा. प्रत्येक वर्षी पक्षाचा वर्धापनदिन वेगळ्या शहरात साजरा करणार. राजकारणात टिकायचं असेल तर संयम महत्वाचा आहे. मोदींचे यश दिसते आहे पण हे श्रेय त्यांच्या कार्यकर्त्यांचे आहे. २०१४ चं भाजपाचं यश इतकी वर्ष झटणाऱ्या कार्यकर्त्यांचे आहेत. अडवाणी, वाजपेयींनी खस्ता खालल्या म्हणून भाजपला यश मिळालं आहे. गेल्या १८ वर्षात मनसेने अनेक चढउतार पाहिले. जनतेनं कायम साथ दिली. आपल्याला यश मिळणार, मी मिळवून देणार. या पक्षात सर्वसामान्य तरुण आहेत. काहीवेळा तुमच्यासमोर वेगळं चित्र उभं केलं जातं.

महाराष्ट्रात जनसंघ, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खऱ्या अर्थाने पक्ष आहेत. तुमच्यातील अनेक लोक खासदार होतील, आमदार होतील या सगळ्यात तुमचा संयम महत्वाचा आहे. ९ एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक गोष्टी बोलणार आहे. अनेक विषयांवर बोलायचं आहे. लोक आता हात जोडून सांगत आहेत आता विश्वास तुझ्यावरच आहे. जनतेचा सरकारवरुन विश्वास उडाला आहे. भुलथापांना बळी पडू नका. महाराष्ट्र एकसंघ राहू नये यासाठी विष कालवलं जात आहे. कोण कोणाच्या पक्षात समजत नाही. राष्ट्रवादीतलं अजून सर्व एकत्र आहेत. माझं अजूनही ठाम मत आहे. मराठा आरक्षण होणार नाही हे मी जरांगेंना सांगितले होते. जे होणार नाही त्याबद्दल सरकार आश्वासन देत आहे. तुम्ही एकत्र यावं हे नेत्यांना नको आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com