सासरे आणि सूनबाईही शिंदे गटात? उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदारांंनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. माजी आमदार तुकाराम काते आणि माजी नगरसेविका समृध्दी काते यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली शिंदे गटात पक्ष प्रवेश झाला आहे. त्याचबरोबर मुंबईतील ठाकरे गटाच्या आणि काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.
मुंबईचे चेंबुरचे माजी आमदार तुकाराम काते आणि त्यांची सून माजी नगरसेविका समृद्धी काते या शिंदे गटात प्रवेश केला आहे.
शिवसेना प्रवेशावेळी तुकाराम काते म्हणाले की, आज माझा प्रवेश यासाठी झाला कारण चेंबूर मध्ये माझी शाळा होती. खूप घाईत सुरू केली होती. शाळा पडणार होती पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला वचन दिले की ते ही शाळा पुन्हा बांधणार आहे. माझ्या भागतातील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जिथे आहे तिथे महाराजांच्या मूर्तीवरून मेट्रो जात आहे. त्याची तक्रार मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले त्यांनी तत्काळ दखल घेतली.
मी जेव्हा महाविकास आघाडी सरकार असताना हीच तक्रार केली होती तेव्हा मिलिंद नार्वेकर यांना महाराजांच्या मूर्ती वरून मेट्रो जात आहे याच्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाशी भेट मगितली होती पण त्यांनी मला कोविड टेस्ट करायला सांगितलं आणि भेट पण घेऊ दिली नाही. असं ते म्हणाले.
दरम्यान, २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने काते यांना डावलून प्रकाश फातर्पेकर यांना उमेदवारी दिली. तेव्हापासून काते पक्षावर नाराज होते. अखेर त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचाह निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्यासोबत त्यांच्या स्नुषा माजी नगरसेविका समृद्धी काते या देखील शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.