बारामतीचा गड उध्वस्त करणं हे इतकं सोपं वाटतं का? आमदार निलेश लंकेंचा सवाल
अमजद खान | कल्याण: काल बारामतीच्या दौऱ्यावर असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टार्गेट केलं. तर, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी 'आजवर अनेक गड उध्वस्त झालेत' असं म्हणत पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये सत्तापालट होणारच असा दावा केला. त्यानंतर काल रात्री आमदार निलेश लंके यांनी बावनकुळेंवर पलटवार केला.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी रात्री उशिरा कल्याणात माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या कार्यालयात भेट दिली. त्यावेळी 'बारामतीचा गड उध्वस्त करणे हे इतकं सोपं वाटतं का?' असा सवाल त्यांनी बावनकुळेंना विचारला आहे.
नेमकं काय म्हणाले लंके?
लंके यांनी भाजपला लक्ष करताना "वक्तव्य करण सोपं असतं, कृती करणं अवघड असतं ,ज्या बारामतीने देशाला विकासाची दिशा दाखवली ,राज्यात प्रत्येक झोपडी पर्यंत विकास पोचविण्याचे काम केलं , बारामतीचा गढ उध्वस्त करणे हे इतकं सोपं वाटतं का ,? असा सवाल करत फक्त बोलायचं म्हणून बोलायचं , कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी हा केविलवाणा प्रयोग आहे" आहे अशी टीका केली .