ताज्या बातम्या
Narhari Zirwal : आमदार नरहरी झिरवाळ आजपासून बेमुदत आंदोलन करणार
आमदार नरहरी झिरवाळ आजपासून बेमुदत आंदोलन करणार आहेत.
आमदार नरहरी झिरवाळ आजपासून बेमुदत आंदोलन करणार आहेत. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
विधानभवनाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आमदार नरहरी झिरवाळ हे आंदोलन करणार आहेत. सरकारने धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देण्याचा जीआर काढण्याची भूमिका मागे घ्यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमात या प्रवर्गातून आरक्षण देण्याचा शासन अध्यादेश काढला तर राज्यातील 60 ते 65 आमदार राजीनामा देतील, असे झिरवाळ यांनी म्हटले होते.
याच पार्श्वभूमीवर आता धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आक्रमक झाले असून नरहरी झिरवाळ हे आजपासून बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.