Newborn Baby
Newborn BabyTeam Lokshahi

डॉक्टरांनी जिवंत बाळाला केलं मृत घोषित; अंत्यसंस्कारावेळी जे घडलं...

सुमारे एका तासाच्या आत नवजात मुलीगी कबरीतून जिवंत बाहेर आली.
Published by :
shweta walge
Published on

जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) बनिहालमध्ये (Banihal) एक निसर्गाचा आगलावेगळा चमत्कार घडला आहे. एका नवजात मुलीला जन्मानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. त्यानंतर नवजात मुलीला (Newborn Baby Girl) दफन करण्यात आले. पण लगेचच सुमारे एका तासाच्या आत नवजात मुलीगी कबरीतून जिवंत बाहेर आली.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुलीला स्मशानभूमीत दफन करण्यास तेथील स्थानिक लोकांनी नकार दिला होता पण तिच्या कुटुंबानं स्मशानभूमीत दफन करण्याचा आग्रह धरला होता. पण मुलगी दफन केल्यानंतर चमत्कारिकरित्या जिवंत सापडल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात आंदोलनं केलं. यानंतर प्रशासनाने डिलिव्हरी रूममध्ये (Delivery Room) काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करून चौकशीचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितलं.

Newborn Baby
दुसरा आठवडा : 'लोकशाही'ची वेबसाईट फॉलो करा आणि जिंका 32 इंच टीव्ही

स्थानिक सरपंच वाणी यांनी सांगितले की, ही नवजात मुलगी बनिहालपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बनकूट गावचे रहिवासी बशारत अहमद गुजर (Basharat Ahmed Gujar) आणि शमीना बेगम (Shamina Begum) यांची आहे. सोमवारी उपजिल्हा रुग्णालयात या मुलीचा जन्म झाल्याचं त्यांनी सांगितले. मुलीला जन्मानंतर लगेचच डॉक्टरांनी मृत घोषित केलं आणि तिला दोन तास रुग्णालयात कोणत्याही डॉक्टरांनी पाहिले नाही, त्यानंतर तिच्या कुटुंबाने तिला होल्लान गावात दफन केले. जेव्हा ते दाम्पत्य रुग्णालयात परतले तेव्हा काही स्थानिकांनी मुलीला स्मशानभूमीत दफन करण्यास विरोध केला असे त्यांनी सांगितले. यामुळे कुटुंबीयांना सुमारे तासाभरानंतर मुलीला कबरीतून बाहेर काढावं लागलं.

वाणी यांनी सांगितले की, जेव्हा मुलीला कबरीतून बाहेर काढले तेव्हा ती जिवंत असल्याचे आढळून आले, त्यानंतर तिला रुग्णालयामध्ये नेण्यात आले. प्रारंभिक उपचारानंतर, मुलीला तज्ज्ञ डॉक्टरांनी उपचारासाठी श्रीनगरला पाठवले.

Newborn Baby
मोठी बातमी : मुंबईसह 14 पालिकांची आरक्षण सोडत जाहीर

या घटनेनंतर, कुटुंब आणि इतरांनी रुग्णालयाच्या आवारात डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या अव्यावसायिक वृत्तीच्या विरोधात आंदोलन केलं. बनिहाल ब्लॉक मेडिकल ऑफिसर (BMO) डॉ राबिया खान (Dr. Rabia Khan) यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर प्रशासनाने डिलिव्हरी रूममध्ये (Delivery Room) काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करून चौकशीचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितलं.

Newborn Baby
पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या 80 वर्षाच्या आजीच्या घरी कधी जाणार?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com