high court
high courtteam lokshahi

टायपिंगमधील किरकोळ चुक भोवली, तुरुंगवासासह दोन लाखांचा उच्च न्यायालयाने ठोठावला दंड

उच्च न्यायालयाने सरकारला ठोठावला दंड
Published by :
Shubham Tate
Published on

मुंबई कार्यालयात संगणकावर टायपिंग करताना किरकोळ टायपिंग झाल्यामुळे एका व्यक्तीला दीड वर्ष तुरुंगवास भोगावा लागल्याची एक विचित्र घटना महाराष्ट्रातील मुंबईतून समोर आली आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला त्या व्यक्तीला दोन लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. (minor mistake in typing high court directed the government)

high court
GST New Rule : घर भाड्याने घेतल्यावर 18% GST आकारला जाईल, तुम्हालाही याचा फटका बसणार

हे प्रकरण रासायनिक विश्लेषक अहवालातील किरकोळ टायपिंग चुकीशी संबंधित आहे. या प्रकरणी एका नायजेरियन व्यक्तीला चुकून दीड वर्षासाठी तुरुंगात पाठवण्यात आले होते. तेव्हा न्यायमूर्ती भारती डेंगरे यांच्या न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला हा आदेश दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात सरकारी वकील ए.ए. टाकळकर यांनी असे कोणतेही धोरण असल्याचा इन्कार केला.

high court
Indian Flag Rule : वाहनावर तिरंगा लावण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या, दुर्लक्ष केल्यास 3 वर्षांची होऊ शिक्षा

त्यावर न्यायालयाने त्यांना फटकारले आणि सांगितले की, जेव्हा जेव्हा सर्वसामान्यांच्या हक्काचा प्रश्न येतो किंवा नुकसान भरपाई द्यावी लागते तेव्हा धोरण नसल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी नुकसान भरपाईचे आदेश देणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. अजून काय तपास व्हायचा आहे. या प्रकरणात अधिकाऱ्याने चूक केली असून, ज्या अधिकाऱ्याने चूक केली त्यांच्याकडून भरपाईची रक्कम वसूल करण्यात यावी. असा आदेश दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com