Dhananjay munde
Dhananjay munde

धनजंय मुंडेना ह्रदयविकाराचा झटका नाही तर भोवळ आली

Published by :
Team Lokshahi
Published on

सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Dhananjay munde
Raj Thackeray Live : मशिदीच्या बाहेर हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार

मंगळवारी रात्री त्यांना ह्रदयविकाराचा सौम्य (Heart Attack) झटका आल्याचं वृत्त समोर आलं होतं, मात्र बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडेंची भेट घेतली. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का आल्याच्या वृत्ताचं खंडन केलं. भोवळ आल्याने काल त्यांची शुद्ध हरपलेली होती, आता त्यांची प्रकृती बरी आहे, त्यांना आयसीयूत ठेवले. मी डॉक्टरांशी बोललो. त्यांचं फुल चेक अप करण्यात येणार आहे.

Dhananjay munde
फ्लॅट विकणे, भाड्याने देण्यासाठी आता सोसायटीच्या एनओसीची गरज नाही

नेमकं काय घडलं?

धनंजय मुंडे यांना संध्याकाळच्या सुमारास छातीत वेदना जाणवू लागल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर काही काळ त्यांची शुद्ध हरपली होती. रुग्णालयात काही काळ ते बेशुद्धच होते. एमआरआयनंतर त्यांना शुद्ध आली. त्यांना सध्या कोणतंही पथ्य नाही, सगळं जेवण करु शकतात. त्यांची फॅमिली बरोबर आहे, घाबरण्याचं कारण नाही, कार्यकर्त्यांनी इथे येऊन गर्दी करु नये, मी आज रात्री पुन्हा येईन, असंही अजित पवारांनी सांगितलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com