पुण्याच्या ऐतिहासिक शनिवारवाड्यासमोर मध्यरात्री ध्वजारोहण

पुण्याच्या ऐतिहासिक शनिवारवाड्यासमोर मध्यरात्री ध्वजारोहण

आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आज देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. आज शासकीय कार्यालये, संस्था, दिल्लीतील लाल किल्ला येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे.

पुण्यातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या शनिवारवाड्यासमोर मध्यरात्री बारा वाजता ध्वजारोहण करण्यात आले. 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारवाडा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या ध्वजारोहणाला खासदार गिरीश बापट यांच्यासह सर्वच पक्षातील नेते उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पुणे महापालिकेचे आयुक्त तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे देखील उपस्थित होते. भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषात ध्वाजारोहण करण्यात आले. यावेळी जवळपास तीन हजारांपेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती होती.

पुण्याच्या ऐतिहासिक शनिवारवाड्यासमोर मध्यरात्री ध्वजारोहण
स्वातंत्र्याची 75 वर्षे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खास फेटा; 8 वर्षात मोदींनी घातलेल्या फेट्यांचे फोटो पाहा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com