Mhada : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपणार; 'या' तारखेला सोडत काढली जाणार

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपणार; 'या' तारखेला सोडत काढली जाणार

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपणार आहे. मुंबईकरांना म्हाडाच्या या लॉटरीत सहभागी व्हायचं असल्यास उद्या सकाळी 11.59 वाजण्यापूर्वी अर्जांची नोंदणी करणं गरजेचं आहे. याआधी म्हाडाने 9 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर अशी मुदत अर्ज दाखल करण्यासाठी दिली होती. मात्र, त्यानंतर म्हाडानं मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता.

ही मुदतवाढ आज संपणार असून आज म्हाडाच्या घरांसाठी अर्ज तुम्ही करु शकता. ज्यांना अर्ज करायचा आहे ते आज अर्ज करु शकता. दुपारी 12 वाजल्यानंतर अर्ज दाखल करता येणार नाहीत. 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11.59 पूर्वी अर्ज दाखल करता येतील अशी माहिती मिळत आहे.

अनामत रक्कम जमा करणे यासाठी 19सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे. अनामत रक्कम जमा करण्यासाठी पुढील 12 तासांचा वेळ असणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांची सोडत 8 ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे.

यासोबतच 27 तारखेला सायंकाळी 6 वाजता अर्जदारांच्या नावांची यादी जाहीर केली जाणार असून 29 सप्टेंबर दुपारपर्यंत ज्यांना यादीवर आक्षेप असणार आहे त्यांना ते नोंदवावे लागणार असून 3 ऑक्टोबरला अंतिम यादी जाहीर होईल. आतापर्यंत 1 लाख 10 हजार 754 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मुदत संपेपर्यंत अर्जात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com