Uday Samant
Uday Samant

मर्सिडीझ बेंझ कंपनी महाराष्ट्रात ३००० कोटींची गुंतवणूक करणार; उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ट्वीटरवर दिली माहिती

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत जर्मनी दौऱ्यावर असताना त्यांनी मर्सिडीझ बेंझ कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली.
Published by :
Naresh Shende
Published on

Uday Samant Tweet : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत जर्मनी दौऱ्यावर असताना त्यांनी मर्सिडीझ बेंझ कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. यावेळी सामंत यांनी महाराष्ट्रातील रोजगाराबाबत या बैठकीत चर्चा केली. मर्सिडिझ बेंझ ही कंपनी यावर्षी महाराष्ट्रामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसह रोजगारात मोठ्या संख्येने वाढ होणार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी ट्वीटरवर दिली आहे.

उदय सामंत ट्वीटरवर काय म्हणाले?

आज जर्मनी दौऱ्यावर असताना मर्सिडिझ बेंझ कंपनीच्या प्रतिनिधीसोबत बैठक झाली. मर्सिडिझ बेंझ ही कंपनी यावर्षी महाराष्ट्रामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसह रोजगारात मोठ्या संख्येने वाढ होणार आहे. यासंदर्भात आज चर्चा झाली.

यावेळी मर्सिडीज कंपनीचे मर्सिडीज-बेंझ ग्रुप ऑफ मॅनेजमेंट बोर्डाचे सदस्य डॉ. जोर्ग बर्झर, पॉलिटिकल ऑपरेशन्स - एक्सटर्नल अफेयर्स, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी संचालक श्रीमती मरिना क्रेट्स, विक्री आणि विपणन, प्रदेश ओव्हरसीज, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी संचालक श्री. मार्टिन शुल्झ, मर्सिडीज-बेंझ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कार्यकारी संचालन प्रमुख श्री. व्यंकटेश कुलकर्णी आदी उपस्थितीत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com