Mumbai Local Mega Block: उद्या मुंबई रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उद्या लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तर काही उपनगरीय लोकल गाड्या रद्द राहणार आहेत. उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारीतीनही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वे
कुठे : सांताक्रूझ ते गोरेगाव अप- डाऊन जलद मार्गावर
कधी : रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत
परिणाम : या ब्लॉकदरम्यान अप- डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तर बोरिवली आणि अंधेरीकडे जाणाऱ्या काही गाड्या हार्बर मार्गावरील गोरेगाव स्थानकापर्यंत धावतील. तर काही उपनगरीय लोकल गाड्या रद्द राहतील
हार्बर रेल्वे
कुठे : वडाळा रोड ते मानखुर्द अप- डाऊन हार्बर मार्गावर
कधी : रविवारी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत
परिणाम : सीएसएमटी येथून सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/ पनवेलसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा, वाशी/बेलापूर/ पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटीअप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वादे/गोरेगाव दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार चालवल्या जातील. याशिवाय ब्लॉक कालावधीत पनवेल ते मानखुर्द दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
मध्य रेल्वे
कुठे : ठाणे- कल्याण पाचव्या सहाव्या अप डाऊन जलद मार्गावर
कधी : शनिवारी रात्री 11.40 ते रविवारी पहाटे 3.40 वाजेपर्यंत
परिणाम : या ब्लॉकदरम्यान सहाव्या मार्गावर धावणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण/दिवा आणि विद्याविहार दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील, तर पाचव्या मार्गावर चालणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार आणि दिवा/कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. तसेच दोन्ही दिशेने निर्धारित वेळेच्या 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
दरम्यान, मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्ददरम्यान अप-डाउन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावर ब्लॉक असेल अशी माहिती रेल्वेकरून देण्यात आली आहे. याशिवाय मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण पाचव्या-सहाव्या मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी दिवसा मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.