Mumbai Megablock: मुंबईच्या पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक
मुंबईच्या पश्चिम आणि मध्य रेल्वे विभागाने रविवारी, 31 मार्च रोजी उपनगरीय विभागात मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्यांवर परिणाम होणार आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. मेगाब्लॉकमुळे लोकलने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
मध्य रेल्वे
कुठे : माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10:14 ते दुपारी 3:18 या वेळेत माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा शिव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. या कालावधीत लोकल ट्रेन विलंबाने धावतील.
पश्चिम रेल्वे
कुठे : चर्चगेट - मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : रविवारी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक
परिणाम : ब्लॉक कालावधीत चर्चगेट-मुंबई सेंट्रलदरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. त्यामुळे अप आणि डाऊन दिशेकडील काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
हार्बर मार्ग
कुठे : पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर
कधी : रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक
परिणाम : सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेल येथून ठाणे येथे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाणे येथे जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत बंद राहतील.