Mega Block
Mega BlockTeam Lokshahi News

Mega Block : उद्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेने उद्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घोषित केला आहे. मेगाब्लॉकमुळे काही मार्गावरील लोकल उशिराने धावणार आहेत.
Published by :
Pankaj Prabhakar Rane
Published on

मध्य रेल्वेने (Central Railway) उद्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घोषित केला आहे. मेगाब्लॉकमुळे काही मार्गावरील लोकल उशिराने धावणार आहेत. मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेले मुंबई विभाग उद्या मेगा ब्लॉकचे वेळापत्रक खालीलप्रमाणे.

माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबविण्यात येणार आहे. ठाण्याच्या पलीकडे या जलद गाड्या पुनश्च डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबवल्या जातील. त्यापुढे या अप जलद सेवा अप जलद मार्गावर वळविल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. कुर्ला आणि वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 या वेळेत पनवेल/बेलापूर/वाशी करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.46 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला आणि पनवेल- वाशी या भागांत विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे- वाशी/नेरूळ स्थानकावरून सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com