Jogeshwari-Goregaon mega Block: आज रात्रीपासून पश्चिम रेल्वेवर 14 तासांचा मेगा ब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक
आज रात्रीपासून पश्चिम रेल्वेवर 14 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी-गोरेगावदरम्यान पुलाच्या कामासाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सर्व लोकल फक्त वांद्रे स्थानकापर्यंत धावणार आहेत. चर्चगेट-बोरिवलीच्या काही धीम्या लोकल अंधेरीपर्यंत धावणार आहेत. तसेच पश्चिम रेल्वेवरील अंधेरी आणि गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत.
बोरिवलीवरून दुपारी 1.14 आणि दुपारी 3.40 वाजता सुटणारी बोरिवली-चर्चगेट लोकल रद्द करण्यात आली आहे. विरार-चर्चगेट दुपारी 1.45 आणि दुपारी 4.15 वाजता दोन अतिरिक्त जलद लोकल धावणार आहे. चर्चगेटवरून दुपारी 12.16 वाजता सुटणारी चर्चगेट-बोरिवली लोकल आणि दुपारी 2.50 वाजताची चर्चगेट-बोरिवली लोकल विरारपर्यंत धावणार आहे. अप हार्बर मार्गावरील शेवटची लोकल गोरेगावहून रात्री 11.06 वाजता सुटणार आहे. दुपारी 1.52 ची सीएएसएमटी-गोरेगाव लोकल रद्द करण्यात आली असून डाऊन हार्बर मार्गावरील शेवटची लोकल सीएसएमटी गोरेगाव रात्री 11.54 वाजता सुटणार आहे.
पुलाच्या कामासाठी आज रात्रीपासून जोगेश्वरी गोरेगावदरम्यान 14 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री 12 पासून रविवारी दुपारी 2 पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे.