चुलत्यावर टिका तर पुतण्याबरोबर गुप्तगू; आमदार रोहित पवारांचा नाव डाव

चुलत्यावर टिका तर पुतण्याबरोबर गुप्तगू; आमदार रोहित पवारांचा नाव डाव

आमदार रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या घरातच नाव‌ डाव टाकला आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
Published by :
shweta walge
Published on

आमदार रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या घरातच नाव‌ डाव टाकला आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अरण येथील कार्यक्रमात रोहित पवार आणि अनिल सावंत यांची भेट झाली. त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. अनिल सावंत हे पंढरपूरमधून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. रोहित पवार यांच्या भेटी नंतर अनिल सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

अरण येथील कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यावर जहरी टीका केली‌ होती. महाराष्ट्राच्या तिजोरीवर खेकड्या सारखा डल्ला मारणाऱ्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विधानसभा निवडणुकीत नांग्या ठेचून काढू असं म्हणाले होते.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागात हजारो कोटी रूपयांचा घोटाळा केला आहे. तानाजी सावंत खोटा माणूस आहे. अशा माणसाला विधानसभा निवडणुकीत जाग दाखवली जाईल. त्यांच्या मतदार संघात परिवर्तन अटळ आहे .अशा शब्दांत रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांचा चांगलाच समाचार घेतला‌ होता. त्याच वेळी त्यांचे पुतणे अनिल सावंत यांनी रोहित पवारांची भेट घेतली . त्यामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे रोहित पवार यांच्या गळाला लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com