मुंबईत गोवरचा उद्रेक; गोवरची एकूण रुग्णसंख्या 126 वर

मुंबईत गोवरचा उद्रेक; गोवरची एकूण रुग्णसंख्या 126 वर

मुंबईत गोवरच्या रुग्णांची संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे.
Published on

मुंबईत गोवरच्या रुग्णांची संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. मुंबईतील गोवर रुग्णांची एकूण रुग्णसंख्या 126 वर पोहोचलीय. कस्तुरबा रुग्णालयात 61 मुलांवर गोवरचे उपचार सुरु आहेत. तर सहा मुलं व्हेंटिलेटर असल्याची माहिती मिळत आहे. गोवरचा उद्रेक झालेल्या विभागात आरोग्य कर्मचाऱ्यांना दररोज ताप, पुरळ असलेल्या नवीन रुग्णांचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

मुंबईतील 12 विभागात रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. अनेक संशयित रुग्णांना मुंबईतील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिरिक्त लसीकरण सत्राचे आयोजन करणे, रुग्ण दाखल करण्याच्या सुविधा वाढविणे, आरोग्य सेविका आणि खासगी डॉक्टरांना गोवरच्या उद्रेकाबाबत अवगत करणे, लसीकरणाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लक्षणे

या आजारामध्ये मुलाला ताप येऊन त्याला सर्दी, खोकला व अंगावर लालसर पुरळ येतात.

अर्धवट उपचार व लसीकरण न झालेल्या मुलांमध्ये या आजारामुळे पुढे होणारी गुंतागुंत गंभीर स्वरूपाची असते.

फुफ्फुस दाह, अतिसार, मेंदूचा संसर्ग तसेच गर्भवती स्त्रीला रुबेलाचा संसर्ग झाल्यास बाळामध्ये व्यंग निर्माण होण्याची शक्यता असते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com