May 2023 New Rule : आज 1 मेपासून बदलले तुमच्या दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहारांमधील 'हे' नियम
आज 1 मे, मे महिना सुरू झाला आहे.आज 1 मे 2023 रोजी देशात अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. तुमच्या दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहारांमध्ये देखिल बदल झाले आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक बदल झाले आहे.
100 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांसाठी, व्यवहाराची पावती 50 दिवसांच्या आत इनव्हॉइस रजिस्ट्रेशन पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे.व्यावसायिकांसाठी जीएसटीमध्ये मोठे बदल होणार आहेत.
मुंबई मेट्रोच्या प्रवासातसुद्धा बदल होणार आहे. मेट्रो लाइन्स 2A आणि 7 या मार्गांवरुन प्रवास करणाऱ्या 65 वर्षांवरील नागरिक, दिव्यांग आणि इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवास शुल्कात 25 टक्के सवलत जाहीर केली आहे.
व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 171 रुपयांनी कमी केल्या आहेत. व्यावसायिक स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर 171.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
तसेच एटीएममधून पैसे काढताना पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांच्या खात्यात शिल्लक नसल्यास, व्यवहार अयशस्वी झाल्यानंतर बँकेकडून 10 रुपयांसह जीएसटी घेतला जाईल.