Mumbai: मुंबईतील काळाचौकी परिसरात भीषण आग; 8 सिंलेडरचा स्फोट

Mumbai: मुंबईतील काळाचौकी परिसरात भीषण आग; 8 सिंलेडरचा स्फोट

मुंबईच्या लालबाग काळाचौकी मिंट कॉलनी परिसरातील बीएमसीच्या साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूलमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

मुंबईच्या लालबाग काळाचौकी मिंट कॉलनी परिसरातील बीएमसीच्या साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूलमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. सिलिंडरच्या आठ स्फोटांचे आवाज आल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. मात्र, सिलेंडरच्या स्फोटामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तसंच आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण बघायला मिळत आहे. दरम्यान, कोरोनाकाळात रुग्णासाठी या शाळेचा वापर करण्यात आला होता. तसंच मागील तीन वर्षांपासून ही शाळा बंद आहे. त्यामुळं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी प्रतिक्रिया देत ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी म्हणाले की, या शाळेत गोर गरीब विद्यार्थी शिकत होते. आम्ही वारंवार ही शाळा सुरू करण्याची मागणी महापालिकेकडे केली मात्र पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं. तसंच पुनर्विकासाच्या नावाखाली सदरची शाळा बंद करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Mumbai: मुंबईतील काळाचौकी परिसरात भीषण आग; 8 सिंलेडरचा स्फोट
India vs Afghanistan 2nd T-20: टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर 6 विकेट्स राखून दणदणीत विजय

दरम्यान, या संपूर्ण परिसरात सुमारे २ हजार नागरिक राहतात. येथे लोकसंख्येची घनता जास्त असून दाटीवाटीत नागरिक राहत असल्याने आगीतून बचावासाठी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. ८ सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. बंद असलेल्या बीएमसीच्या साईबाबा पाथ स्कूल या शाळेमध्ये स्फोट झाल्याचे समोर येत आहे. शाळेत एक लग्नकार्याचा हॉल आहे, तिथं कैटरींगचा व्यवसाय चालतो. सिंलेडर त्यासाठीच तिथं ठेवल्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com