Pune : पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनला भीषण आग

Pune : पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनला भीषण आग

पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. तळमजल्यावर फोमच्या साहित्याला आग लागून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता.

या घटनेची माहिती मिळतात अग्निशामक दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले. आग नियंत्रणात आली असून यामध्ये कोणीही जखमी नसल्याची माहिती मिळत आहे. वेल्डिंगचे काम सुरु असताना आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सुदैवाने यावेळी मेट्रो प्रवासी वाहतूक बंद होती. याच पार्श्वभूमीवर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, मंडई मेट्रो स्टेशनची आग नियंत्रणात, सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही !मंडई मेट्रो स्टेशनला आग लागल्याचा दुर्दैवी प्रकार काही वेळापूर्वी घडला होता. आगीची बातमी समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच फायर गाड्यांच्या माध्यमातून आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

यासोबतच ते म्हणाले की, सदरील घटना मेट्रोचे प्रवासी कामकाज संपल्यानंतर घडली होती. मेट्रो स्टेशनच्या भागात वेल्डिंगची काम सुरू असताना हा प्रकार घडला. यासंदर्भात मेट्रोचे कार्यकारी संचालक श्री. श्रवण हर्डीकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली असून या घटनेचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मेट्रो प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे. असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com