थायलंडमध्ये सामूहिक गोळीबार, 34 जणांची मृत्यू
नवी दिल्ली : थायलंडमधील बाल केंद्रावर गोळीबार झाल्याची घटना समोर येत आहे. यामध्ये 34 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुले आणि प्रौढ दोघांचाही समावेश आहे. स्थानिक वृत्तसंस्थेनुसार, आरोपी हा माजी पोलीस अधिकारी असून त्याने स्वत:वरही गोळी झाडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाल केंद्रावर आज अचानक गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात 34 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 22 बालकांचा समावेश आहे. यानंतर आरोपीने आपल्या मुलगा आणि पत्नीवरही गोळ्या झाडल्या व नंतर स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली. आरोपी हा माजी पोलीस अधिकारी असून त्यांना काही काळापूर्वीच नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते.
दरम्यान, थायलंडमध्ये परवानाधारक बंदुकांची संख्या इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. परंतु, अधिकृत आकडेवारीत मोठ्या प्रमाणात असणाऱ्या अवैध शस्त्रांचा समावेश नाही. याआधी, 2020 मध्ये असेच सामूहिक गोळीबार झाला होता. एका सैनिकाने 29 लोकांना गोळ्या घालून ठार केले होते. यामध्ये 57 लोक जखमी झाले होते.