Corona Virus
Corona VirusTeam Lokshahi

Covid19 : चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा मास्क वापरण्याचा सल्ला

दिल्लीसह अनेक राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय.
Published by :
Sudhir Kakde
Published on

कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या (Covid19 Fourth Wave) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील अनेक राज्यांत सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. राजधानी दिल्लीसह (Delhi) अनेक राज्यांत परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत जातेय. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार सध्या परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. रेल्वेने याच पार्श्वभूमीवर नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. (Mask Mandatory in Railway)

Corona Virus
शिवसेनेवर टीझर डिलीट करण्याची नामुष्की

रेल्वेने घेतलेल्या एका महत्वपुर्ण निर्णयानुसार मास्क वापरण्याचा सल्ला प्रवाशांना देण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा प्रवाशांना कोरोनाचे काहीसे निर्बंध पाळावे लागणार आहेत. रेल्वेने घेतलेल्या एका महत्वपुर्ण निर्णयानुसार मास्क वापरणं अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळे आता पुन्हा प्रवाशांना कोरोनाचे काहीसे निर्बंध पाळावे लागणार आहेत. रेल्वेच्या सर्व झोनच्या मुख्य व्यवस्थापकांना पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या असून, या अंतर्गत रेल्वेमध्ये प्रवास करताना मास्क घालणं बंधनकारक केलं असल्याचं पत्रात म्हटलं आहे. तसंच मास्क वापरणाऱ्यांवर कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक (प्रवासी) नीरज शर्मा यांनी दिली आहे. त्यामुळे आता प्रवशांना मास्क वापरावा लागणार आहे.

Corona Virus
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राची दुर्दशा - रवी राणा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com