Devendra Fadnavis: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Devendra Fadnavis: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने हा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठीसह पाली, आसामी, प्राकृत आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनी मोठी घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

Devendra Fadnavis: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Marathi Language: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

देवेंद्र फडणवीस ट्विटरवर पोस्ट शेअर करत म्हणाले की, आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस!

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो.

हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

#मायमराठी #अभिजातमराठी

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com