दुकानांवरील पाट्या मराठीत नसल्यास होणार कारवाई; दुकानदारांना अल्टीमेटम
मराठी पाट्यांच्या विषयावर राज्य सरकार पुन्हा एकदा आक्रमक झालं आहे. जर पाट्या मराठीत लावल्या गेल्या नाही तर कारवाई होईल अशी माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी दिली. राज्यातील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी पाट्या (Marathi Board on Shops) लावण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार सर्व दुकानांना या महिनाभराच्या कालावधीत मराठी पाट्या लावाव्या लागणार आहेत. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी दिला.
मराठी भाषेच्या मुद्दयावरुन अनेकांनी यापुर्वी अनेकांनी वेगवेगळी आंदोलनं आहेत. अखेर राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी याबद्दलचा निर्णय घेतला. त्यामुळे आता दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र तरीही अनेकांनी मराठी पाट्या लावलेल्या नाहीत. त्यामुळे आता राज्य सरकारने दुकान मालकांना पुन्हा एकदा महिनाभराची मुदत वाढ देऊन पाट्या मराठीत करण्याचं आवाहन केलं आहे. दुकानांवरील मराठी पाट्यांबद्दलच्या या निर्णयाचं नागरिकांनी स्वागत केलं आहे.
दरम्यान, दुकाने व आस्थापनांवरील पाट्या मराठीतच असाव्यात यासाठी विधिमंडळात कायदा केल्याने पळवाट बंद झाली आहे. मराठीत पाट्या लावण्याच्या नियमांची अंमलबजावणी महापालिका व नगरपालिकांवर सोपवण्यात आली आहे. मराठी पाट्या लावण्यासाठी दुकानदारांना वेळ देण्यात आला आहे', असं देसाई म्हणाले. मात्र यावर पालिका अधिकाऱ्यांनी प्रत्येक वॉर्डात जाऊन नियम पाळले जात आहेत की नाही याची दक्षता घेतली पाहिजे असं मत दादर व्यापारी संघाकडून आलं आहे. या निर्णयाला सगळ्यांनी स्वागत केलं आहेच मात्र त्याची अंबलबजावणीही त्वरित झाली पाहिजे असं मत देखील काहींनी व्यक्त केलं आहे.