मराठा समाजाच्या मागण्या अद्यापही अपुर्ण; मराठा क्रांती मोर्चाचा थेट विधानभवनात ठिय्या
मुंबई : मराठा समाजाच्या (Maratha) काही मागण्या घेऊन राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले (Chhatraparti Sambhajiraje Bhosale) यांनी आंदोलन केलं होतं. मागण्या पुर्ण केल्या जातील हे आश्वासन मिळाल्यानंतर संभाजीराजे भोसले यांनी उपोषण थांबवलं होतं. मात्र अद्याप कुठल्याही मागण्या मान्य न झाल्याने आज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज थेट मंत्रालयात आंदोलन सुरु केलं आहे.
खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा समाजाच्या मागण्या घेऊन मुंबईत आझाद मैदानावर उपोषण केलं होतं. यावेळी अनेकदिवस हे उपोषण सुरु असल्याने संभाजी राजेंची प्रकृती खालावली होती. राज्य सरकारच्या वतीने अनेक मंत्र्यांनी याठिकाणी दाखल होत संभाजी राजेंचं उपोषण सोडवलं होतं. काही आश्वासनंं यावेळी राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली होती. मात्र अजुनही ही आश्वासनं पुर्ण करण्यात आली नाहीत. यावरुनच आज मंत्रालयात आंदोलन करण्यात आलं.