Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal
Manoj Jarange Patil SpeechLokshahi

Manoj Jarange vs Chhagan Bhujbal: "आम्ही त्याला पाडणार आहोत; मनोज जरांगे पाटील यांचा छगन भुजबळांवर घणाघात

"मराठ्यांचा मतदानाचा कचका कसा आहे, हे त्यांना कळालं आहे. ते आता मराठ्यांच्या नादी लागत नाही. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या ताकदीमुळं मी खूप खंबीर झालो आहे"
Published by :
Naresh Shende
Published on

Manoj Jarange Patil Speech : मराठ्यांचा मतदानाचा कचका कसा आहे, हे त्यांना कळालं आहे. ते आता मराठ्यांच्या नादी लागत नाही. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या ताकदीमुळं मी खूप खंबीर झालो आहे. ते मला अडाणी समजत आहेत. मला कायद्याचा अभ्यास नाही, असं ते म्हणतात. हा गावठी आहे. गावठ्यानं कसा ठोका दिला आहे, हे छगन भुजबळांना माहित झालं आहे. मराठ्यांच्या जीवावर मंत्री झाला आहे. आता सावध राहा. येवल्याचे लोक म्हणतात, पाटील तुम्ही त्याला निवडून द्या. पण आम्ही त्याला पाडणार आहोत, असा एकेरी उल्लेख करत मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते परभणीत मराठा समाजाला संबोधीत करताना बोलत होते.

मनोज जरांगे पुढे म्हणाले, मी अडाणी असेल, पण मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं. मी सरकारला सांगितलं होतं, ५४ लाख नोंदणी निघतील. पण सरकारने मला ठामपणे सांगितलंय ५४ लाख नाही, तर ५७ लाख नोंदी निघाल्या आहेत. एका नोंदीवर ४०-५० प्रमाणपत्र निघत आहेत. आपण तीनच धरले, तर दीड कोटी मराठा आजच आरक्षणात गेला आहे. छगन भुजबळ मला म्हणतो, मी अडाणी आहे. पण मराठ्यांना आरक्षण दिलं ना...छगन भुजबळांवर टीका करताना जरांगे म्हणाले, मी कसाही दिसूदे. मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. तुला मी आरक्षणात हरवलं. आता मराठ्यांच्या मतांची दहशत दिसली पाहिजे. माझ्या माता-भगिनींचा आदर वाढला पाहिजे.

मराठा समाज स्वत:ची काम सोडून या आंदोलनात सहभागी होत आहे. मुलांना न्याय मिळावा म्हणून हा आक्रोश आहे, हे सरकारनं समजून घेणं खूप गरजेचं आहे. सरकार या गोष्टी समजून घेईल, अशी मराठा आंदोलकांना आशा आहे. न्यायासाठी मराठी माणूस आता घरात बसायला तयार नाहीत. लक्ष्मण हाके म्हणाले, तुम्ही विधानसभेत कितीही उमेदवार पाडा, तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले, त्यांना आम्ही विरोधक मानलं नाही. कधी मानणार नाही. ज्या माणसाला आपण विरोधक आणि शत्रू मानत नाहीत. त्यांना उत्तर देण्याची गरज नाही. छगन भुजबळ या सर्व गोष्टी घडवून आणत आहेत, असं म्हणत मनोज जरांगे यांनी भुजबळांवर टीका केली.

मनोज जरांगे प्रत्येक आंदोलनात भूमिका बदलतात, असं विरोधक म्हणतात, यावर जरांगे म्हणाले, पहिल्या दिवसाची आणि आजच्या दिवसाची मागणी काय आहे? हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे. तुमच्या अनेक रॅली पाहिल्या, मागच्या रॅलीत मराठे दिसले नाहीत, त्यामध्ये इतर समाजाचा सहभाग मोठा होता, यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, छगन भुजबळ जे करत आहेत, ते सामन्य ओबीसी बांधवांना, दलित, मुस्लिमांना चांगलं वाटत नाही. जातीवाद पसरवणं, मराठ्यांच्या नोंदी सापडल्यानंतरही त्या रद्द करा, असं सांगतात. जर सरकारी नोंदी सापडल्या असतील, तर आपले नेते फुकटचं भांडण का करत आहेत? नोंदी सापडल्या नसत्या, तर मराठ्यांचं गॅझेट नसतं. सामान्य ओबीसी आणि सामान्य मराठ्यांमध्ये भांडण लावण्याचं काम करायला लागले आहेत. हे त्यांच्या लक्षात आलं आहे. म्हणून सर्व जातीधर्माचे लोक रॅलीत सहभागी व्हायला लागले आहेत, असंही मनोज जरांगेंनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com