SpiceJet Lay Off: स्पाईसजेट देणार १४०० कर्मचाऱ्यांना नारळ; कारण काय?

SpiceJet Lay Off: स्पाईसजेट देणार १४०० कर्मचाऱ्यांना नारळ; कारण काय?

स्पाईसजेट कंपनीची आर्थिक स्थिती नाजूक झाल्याच्या पार्श्वभूमीवर लवकरच कंपनीतून १,४०० कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात येणार आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

आर्थिक संकटाचा सामना करत असलेली बजेट एअरलाईन्स स्पाईसजेट हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी करत असल्याची माहिती मिळत आहे. स्पाईसजेट कंपनीची आर्थिक स्थिती नाजूक झाल्याच्या पार्श्वभूमीवर लवकरच कंपनीतून १,४०० कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात येणार आहे, जे कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे 15 टक्के इतकं आहे. सध्या कंपनीचे एकूण कर्मचारी नऊ हजारांच्या आसपास आहेत.

कंपनी सध्या 30 विमानं चालवत आहे, त्यापैकी 8 भाडेतत्त्वावर घेतलेली आहेत. स्पाईसजेटच्या अनेक कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार असून त्यांना त्यासंदर्भात कंपनीकडून माहितीही देण्यात आली आहे. यापूर्वी स्पाईसजेटचे सर्व कर्मचारी वेतन कपातीचा सामना करत होतेच, पण त्यासोबतच गेल्या अनेक दिवसांपासून कंपनीतील कर्मचाऱ्यांचे पगारही रखडले आहेत. आर्थिक समस्या निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने ही कपात करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com