Manoj Jarange Patil Latest News
Manoj Jarange PatilLokshahi

Manoj Jarange Patil: "...तुला महागात पडेल, "; मनोज जरांगेंनी भाजप नेते प्रसाद लाड यांना दिला इशारा

मनोज जरांगे पाटील यांना देवेंद्र दोषी नावाचा रोग झाला आहे, असं भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले होते. यावर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Manoj Jarange Patil vs Prasad Lad: मनोज जरांगे पाटील यांना देवेंद्र दोषी नावाचा रोग झाला आहे, असं भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले होते. यावर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. "हे कोण आहे बांडगुळ. माझ्या नादाला नको लागू. तू किती पैशावाला आणि भ्रष्टाचारी आहे. तुला शेणात थापलेल्या गौऱ्यासुद्धा खाता येणार नाही. मनोज जरांगे जातीसाठी लढतो. तू जात विकून घर मोठं करणारी औलाद आहे. तुम्ही मोठे लोक आहात म्हणून आमच्या जातीचे भूषण होता. पण तुम्ही नालायक निघाले आहेत. आमच्या गोर-गरिब मराठ्यांमध्ये ढवळाढवळ करू नको. तुला महागात पडेल", असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांना दिला आहे.

पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले, २० ते ७ म्हणजे १७ दिवस झाले. महाराष्ट्रात १७ दिवस कुणीच जगू शकत नाही. २० जर मी आमरण उपोषणाला बसलो आणि पुढचे सात दिवस धरले तर १७ दिवस अन्न पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. मी तरी नाही जगू शकत. मला आधीच खूप वेदना आहेत. त्यांनी मला सोडलं नाही, तर मी तसाच उपोषण करत ७ तारखेला रॅलीत जाणार आहे. सरकार १७ दिवस मरणाची वाट पाहत असेल, तर हे सरकारच असू शकत नाही. मी ७ तारखेपर्यंत जगलो, तर ७ तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर जाईल. मेलो तर नाही जाणार. पुढचे दौरे रद्द होतील.

राज्य सरकारच्या शिष्टमंडळात कोणत्याही प्रकारची सकारात्मक चर्चा झाली नाही. एक महिन्यात काहीही केलं नाही. त्यांनी गुन्हे मागे घेतले नाहीत. सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणीही केली नाही. मला कोणताही प्रस्ताव आला नाही. मी २० तारखेला उपोषणाला बसणार आहे. मराठा समाजाची किती तारखेला बैठक घ्यायची याबाबत मी उपोषणाच्या दिवशी ठरवणार आहे. ज्यावेळी बैठक होईल, त्यावेळी मी समाजाला विचारणार आहे की २८८ उभे करायचे की २८८ पाडायचे? असं मोठं विधान जरांगे यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com