Manoj Jarange Patil: 'सरकार स्थापनेनंतर आरक्षणाचा लढा पुन्हा उभारणार'- मनोज जरांगे पाटील
विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबंरला झाले आणि 23 नोव्हेंबंरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. हा निकाल अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरला होता. या निकालावरून विरोधीपक्षाकडून अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. याचपार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आता निवडणूक संपली सरकार स्थापन होईल. आता मराठा समाजाने आरक्षणासाठी लढा उभारायचा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधून केले आहे.
यामुळे एक नवी ठिणगी पेटते का? असा प्रश्न समोर आला आहे. मराठा समाजाने आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी तयारी लागा असे आदेश देखील मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला दिले आहे.
सविस्तरपणे सांगायचे झाले तर, मनोज जरांगे पाटील यांनी सरकार स्थापन होताच पुन्हा आंतरवली सराटी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी सामूहिक उपोषण करणार असल्याचं जाहीर केले आहे. सर्व समाजाने आपले शेतीतील कामे आटवून अंतरवाली सराटीकडे येण्याचं आवाहन पाटलांनी केले आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण लागू होत नाही. तोपर्यंत आंदोलन आणि उपोषणावर ठाम असणार असल्याचा देखील पाटलांनी स्पष्ट केले आहे.