जरांगे पाटलांच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे

जरांगे पाटलांच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे

मनोज जरांगे यांची आज बीड मध्ये निर्णायक इशारा सभा पार पडत आहे. या सभेसाठी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव बीड येथील पाटील मैदानात दाखल झाले आहेत.
Published by :
shweta walge
Published on

1. देशातील मोठी जात संपवण्याचा तुमचा घाट दिसतो. एकदा जर मोठा समुदाय खवळला तर तुमचा सुपडा साफ होईल. तुमचं राजकीय अस्तित्व साफ होईल. माझ्या मराठ्यांना डिवचू नका.

2. आता सावध व्हा. कोट्यवधी मराठा एकत्र आला आहे. सामंजस्याने ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या. त्याचं (छगन भुजबळ) ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर येणारं आंदोलन तुम्हाला जड जाईल.

3. हे सरकार झोपेचं सोंग घेत आहे. मराठा समाजाचा अपमान करत आहे. मराठा समाजाची फसवणूक करत आहेत. मराठा समाजाच्या जीवावर सत्ता मिळवतात आणि सत्ता मिळाल्यावर छगन भुजबळ सारख्यांना त्याचा लाभ दिला जात आहे.

4. हे वादळ पाहून येवल्याच्या येडपटाला संडास लागल्याशिवाय राहणार नाही. मुंगीलाही जागा मिळणार नाही, एवढी ताकद मराठा समाजाने दाखवली.

5. मराठा आरक्षण कसं आणतात ते नुसतच पाहा. आपल्याला डाग लागला. शांततेने आंदोलन करणाऱ्यांवर डाग लावला. कोणी म्हणतंय घरं जाळलीत. कोणी म्हणतंय हॉटेल जाळलंय. आमच्यावर उगाच डाग लावलाय. आम्ही घाबरणार नाही.

6. नेता वगैरे मानू नका. आपल्यातील लोकांनी काम केलं तरच नेता माना. मराठा असला तरी नेता मानू नका. आता निवडणुकीत जवळ आला तर चप्पलच दाखवा. आपल्या जीवावर मोठं व्हायचं आणि आमचे मुडदे बघता.

7. आपल्या पोरांनी काही केलं नाही तरी गुन्हे दाखल केले आहेत. निष्पाप पोरांना अडकवण्याचं काम सरकारने केलं. मराठ्यांना काही करायचं असतं तर आजच केलं असतं. सरकार झोपू नका.

8. मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती. मराठ्यांना राज्यात शांतता हवी. करोडोच्या संख्येने एकत्र आलाय. शांततेत शहरात गेला. शांततेत मैदानात आला. विनाकारण त्याला डाग लावू नका. मराठ्याला विनाकारण डिवचू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

9. मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावी, सरकारला खूप वेळ दिला. मुंबईत जाताना कुणी हिंसा करु नये. ३ कोटी मराठे मुंबईत येणार आहेत. जो हिंसा करेल तो आपला नाही, असे जरांगे म्हणाले. 

10. सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, आमच्यावर डाव टाकू नये. आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com