manoj jarange dasara melava
manoj jarange dasara melava

Manoj Jarange: बीडमध्ये जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा बीड जवळील नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा बीड जवळील नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून भाषणाचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. नारायण गडावरील 900 एकरवर दसरा मेळावा होत असून जवळपास 200 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे.

राज्यभरातून येणाऱ्या सकल मराठा समाजाचे नियोजन नेमक्या कशा स्वरूपात असणार हे ठरविण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज नारायण गडावर दाखल होणार असून आतापर्यंतच्या सर्व गर्दीचे रेकॉर्ड मोडेल असं मराठा सेवकांनी सांगितले आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी समाज बांधव इथे येणार आहे.

दरम्यान याच वेळी बीड जिल्ह्यात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा देखील दसरा मेळावा असणार आहे. जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत नारायण गडावर पहिला दसरा मेळावा होतोय. त्यामुळे या दसरा मेळाव्याकडे महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. हा दसरा मेळावा राजकीय नसणार हे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. मात्र जरांगे पाटलांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com