Chhagan Bhujbal and Manoj Hake
Chhagan Bhujbal and Manoj Hake

"...तोपर्यंत हे आंदोलन आम्ही थांबवणार नाही"; सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मनोज हाकेंनी स्पष्टच सांगितलं

ओबीसी समाजासाठी मनोज हाके आणि नवनाथ वाघमारे गेल्या दहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारच्या शिष्टमंडळानं हाके आणि वाघमारे यांची भेट घेतली.
Published by :
Naresh Shende
Published on

ओबीसी समाजासाठी मनोज हाके आणि नवनाथ वाघमारे गेल्या दहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारच्या शिष्टमंडळानं हाके आणि वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मनोज हाके म्हणाले, ज्या सरकारने प्राधान्यक्रमाने सर्टिफिकेट इश्यू केले. त्या सरकारकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण आम्ही त्यावर लाखो हरकती नोंद केल्या आहेत. त्या हरकतींची श्वेतपत्रिका आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन आम्ही थांबवणार नाही.

काय म्हणाले मनोज हाके?

शासनाने आमच्या दोन मागण्या मंजूर केल्या आहेत. सग्या सोयऱ्यांचा अध्यादेश अजून यायचा आहे. त्याआधी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. बैठक झाल्याशिवाय सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढणार नाही. अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. बोगस कुणबींच्या ज्या हरकती आहेत, त्यावरही आम्ही हरकत घेतली होती. पण शासनाने आम्हाला सांगितलंय की, खोटे कुणबी सर्टिफिकेट घेणारे आणि देणारे, या दोघांवर आम्ही कारवाई करू.

पण एक कार्यकर्ता म्हणून माझं म्हणणं असं आहे, ज्या सरकारने प्राधान्यक्रमाने सर्टिफिकेट इश्यू केले. त्या सरकारकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण आम्ही त्यावर लाखो हरकती नोंद केल्या आहेत. त्या हरकतींची श्वेतपत्रिका आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन आम्ही थांबवणार नाही. हे आंदोलन स्थगित झालेलं आहे. वरिष्ठ आणि संयोजन समितिच्या म्हणण्यावरून हे आंदोलन स्थगित केलं आहे. हे आंदोलन थांबवलं नाही.

काय म्हणाले छगन भुजबळ?

आबोसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा आजचा दहावा दिवस आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने हाके यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. आम्ही त्यांची समजूत काढली आहे. पुढे आपल्याला लढायचं आहे. आम्हाला आमचे दोन वाघ पुन्हा मैदानात हवे आहेत. कुणी धमक्या देत असेल, तर देऊद्या. आम्ही कुणालाही धमक्या देत नाहीत. आमच्या ताटातलं आरक्षण आम्हाला राहू द्या.

मराठा समाजला तुम्ही वेगळं आरक्षण द्या. लोकशक्ती सर्वात मोठी शक्ती आहे. आमच्यावर अन्याय होत आहे, आम्ही तो कधीपर्यंत सहन करणार? आरक्षण हा गरिबी हटावाचा कार्यक्रम नाही. गरिबांना अधिक देण्याचं काम केलं पाहिजे. विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण दिलं पाहिजे. जातनिहाय जनगणनेला फडणवीसांचा पाठींबा आहे. आपआपसात लढाल तर सरकारचं भविष्य काळोखात जाईल. मनोज जरांगे यांनी लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा करावी, असं आवाहनही छगन भुजबळ यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com