मन की बात" कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सेवा विवेक संस्थेच्या सामुदायिक उपक्रमाचे केले कौतुक
संदीप गायकवाड, विरार
मन की बात कार्यक्रमाला संबोधित करताना. वर्षातील शेवटचा म्हणजेच, ९६ वा एपिसोड पार् पडला. पंतप्रधानांनी यावेळी महाराष्ट्रातील पालघर जिल्हातील आदिवासी समाजातील कुशल बांबू कारागीर लोकांकडून बांबू हस्तकला पासून तयार करण्यात येणाऱ्या वस्तू ची माहिती दिली.बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या बॉक्स,खुर्ची,चहादाणी,टोकेरी,आणि ट्रे सोबत विविध गोष्टींची प्रशंसा केली तसेच त्यांनी बनवलेल्या वस्तू आज खूप लोकप्रिय झाल्याआहेत यामुळे आदिवासी महिलांना रोजगार सोबतच मानसन्मान मिळत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात कार्यक्रमानंतर आपल्या ट्विटर हँडल वरून सेवा विवेक सामाजिक संस्थेचे पालघर जिल्ह्यातील सामुदायिक विशेष कौतुक केले. सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी गरुजू महिलांना घर काम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा त्यांना सन्मान जनक रोजगार प्राप्त होवा ह्यातूने सेवा विवेक ने पुढाकार घेतला आहे. अश्या महिलांना मोफत बांबू हस्तकलचे प्रशिक्षण दिले जाते.पालघर जिल्हातील आदिवासी महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत असून आतापर्यंत शेकडो हून अधिक महिलांनी प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण घेतल्यावर महिलांनी बांबू पासून उत्तम दर्जेदार प्रयावरण पूरक उत्पादने तयार करण्यात हातखंडा मिळवला आहे. उत्पादनाच्या दर्जेदारपणामुळे चांगली मागणी आहे. ह्या वर्षी महिलांनी बनवलेल्या राखी व कंदीलांना विदेशातही मागणी होती.तसेच वर्षभर महिला इतर वस्तू मोठ्या प्रमाणात तयार करतात यामध्ये बांबूपासून विविध प्रकारचे पेन होल्डर ,मोबाईल होल्डर , पात्राधर , फिंगर जॉइंट ट्रे तयार आदी सारख्या ३६ बांबू हस्तकलेच्या आकर्षक वस्तू तयार करतात.
या मागणीचा थेट परिणाम पालघर जिल्हातील आदिवासी महिलांचा रोजगार निर्मिती वर होत असून त्यांना प्रशिक्षणानंतर घरच्या घरी रोजची कामे सांभाळून फावल्या वेळेत बांबू काम करून रोजगाराची मोठी संधी मिळाली आहे. चांगला रोजगार प्राप्त होत असल्यामुळे महिला घरची जबाबदारी स्वीकारून मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देत आहेत्.गेल्या वर्षी सेवा विवेक च्या कार्याचा माजी राष्ट्रपती व महामहीम राज्यपाल यांनी कौतुक केले आहे.माजी राष्ट्रपती द्वारे हस्तकला प्रशिक्षित आदिवासी महिलांचा सत्कार करण्यात आला.आज संस्थेतील अनेक प्रशिक्षण घेतलेल्या महिला ह्या संस्थेच्या प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत तसेच नवीन महिलांना त्या प्रशिक्षण देत आहेत . या मुळेच आदिवासी समाजातील महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे.