Mann Ki Baat : आज पंतप्रधानांची 'मन की बात'; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची मन की बात (Mann Ki Baat) आहे. ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळी 11 वाजता मन की बात कार्यक्रम होणार आहे. जून महिन्याच्या शेवटच्या रविवारी केलेल्या मन की बात मध्ये पंतप्रधान मोदींनी भारतानं स्टार्टअप्समध्ये केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं होतं. तसंच आगामी योग दिनाची थीम घोषित केली आणि योग दिन उत्साहात साजरा केला.
दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आकाशवाणी आणि डीडी चॅनलवर प्रसारित केल्या जाणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा आजचा 91वा भाग आहे. प्रसार भारती आपल्या आकाशवाणी नेटवर्कवर हा कार्यक्रम 23 भाषांमध्ये प्रसारित करते. याव्यतिरिक्त प्रसार भारती आपल्या विविध डीडी चॅनल्सवर या कार्यक्रमाच्या व्हिज्युअल आवृत्त्या हिंदी आणि इतर भाषांमध्येही प्रसारित केल्या जातात.
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 90वी मन की बात आहे. या कार्यक्रमाचं पहिलं प्रसारण 3 ऑक्टोबर 2014 साली झालं होतं. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात.