ताज्या बातम्या
Manisha Kayande Tweet | महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? मनिषा कायंदे यांचं ट्विट; नेमका अर्थ काय?
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, यावर महायुतीत तिढा कायम. मनिषा कायंदे यांच्या सूचक ट्विटचा नेमका अर्थ काय?
राज्यात महायुतीने बहुमत मिळवल्यानंतरही नवीन मुख्यमंत्री कोण, याचा तिढा अद्याप सुटला नाही. मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करावं अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. या सगळ्या घडामोडीत शिवसेना शिंदे गटाच्या मनीषा कायंदे यांनी एक सूचक ट्विट केलं आहे ज्यामध्ये 'एकनाथ' है तो सेफ है' अस म्हटलं आहे.