आईला 1500 रु तर दिलेस मामा, पण माझ्या सुरक्षेचं काय? वर्ध्यात रेखाटलेले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल
भूपेश बारंगे | वर्धा: वर्ध्यातील कारंजा (घाडगे) येथील शाळेच्या भिंतीवर रेखाटलेले छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या छायाचित्रातून एका शिक्षकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संदेश दिला गेला आहे.
राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेतून लाडक्या बहिणीला 1500 रुपयेचा अर्थसहाय्य मदत त्यांच्या खात्यात जमा होत आहे. यातच राज्यात मुली असुरक्षित असल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. बदलापूर येथे शाळेतच मुली असुरक्षित असल्याची घटना घडली. दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला. याचे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात पडसाद दिसून आले. यातच वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील कस्तुरबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयमधील एका शिक्षकाने शाळेच्या भिंतीवर चित्र रेखाटलेले आहे. यातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या छायाचित्रातून संदेश दिला जात आहे.
या छायाचित्रवरून दिसून येत आहे. या छायाचित्रमध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांचा छायाचित्र रेखाटले असून त्यांच्या समोर एक लहान मुलगी त्यांच्या उजव्या हाताला राखी बांधत आहे. तर दुसऱ्या हाताला महिला मंडळ राखी बांधत असलेले चित्र तयार केले आहे. सोबत त्यावर शाळेचे नाव लिहले असून बाजूला एक संदेश लिहला आहे. "आईला 1500 रु तर दिलेस मामा पण माझ्या सुरक्षेचं काय?" अस यावर लिहले गेले आहे. हा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या छायाचित्रे संदेश थेट प्रश्न विचारला गेला आहे. सध्या हे छायाचित्रे रेखाटले आहे.