ताज्या बातम्या
'चोर मचाये शोर'चा नारा देत ठाकरेंविरोधात भाजपा-शिवसेना शक्तिप्रदर्शन करणार
महापालिकेचे अधिकारी आणि ठाकरे गटाशी संबंधित नेत्यांच्या घरावर धाडी टाकण्यात आल्या आहेत.
महापालिकेचे अधिकारी आणि ठाकरे गटाशी संबंधित नेत्यांच्या घरावर धाडी टाकण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या 1 जुलै रोजी हा मोर्चा निघणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता 'चोर मचाये शोर'चा नारा देत आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला भाजप-शिवसेना आणि आरपीआय महायुती प्रत्युत्तर देणार आहेत. भाजपच्या नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयातून शनिवारी या मोर्चाला सुरुवात होणार आहे. ठाकरेंविरोधात महायुती रस्त्यावर उतरत शक्तिप्रदर्शन करणार आहे.