महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद; कोणत्या घोषणा करण्यात येणार?

महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद; कोणत्या घोषणा करण्यात येणार?

विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक बैठका, दौरे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. MCA सभागृहात दुपारी अडीच वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागावाटपासह इतर काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच आज आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.

यातच काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. महायुती आज पत्रकार परिषदेमधून कोणत्या घोषणा करते, काय बोलते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com