ताज्या बातम्या
पुण्यात महाविकास आघाडीचं निषेध आंदोलन; शरद पवार आंदोलनात सहभागी
पुण्यात महाविकास आघाडीचं निषेध आंदोलन
बदलापूरमधील एका शाळेमध्ये दोन शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.
मात्र मविआच्या बंदला मुंबई हायकोर्टाकडून मज्जाव केला. बंद मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडीकडून राज्यभर मूक आंदोलन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलन करण्यात येत आहे. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे.
या पुण्यातील आंदोलनात शरद पवार देखील तोंडाला काळी पट्टी लावून तसेच हाताला काळी फित बांधून आंदोलनात सहभागी झाले असून महाविकास आघाडीचे नेते देखील हा आंदोलनात सहभागी झाले आहेत. सुप्रिया सुळे देखिल या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात महिलासुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहेत.