नागपुरात उद्या होणार महासोहळा; पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन; कशी केली आहे तयारी?

नागपुरात उद्या होणार महासोहळा; पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन; कशी केली आहे तयारी?

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचं उद्घाटन 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचं उद्घाटन 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग आहे. नागपूर ते शिर्डीपर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. हा मार्ग १० जिल्ह्यांतील ३९२ गावांमधून धावेल आणि दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सात तासांपर्यंत कमी करेल. 11 तारखेनंतर सामान्य नागरिकांसाठी समृद्धी महामार्ग खुला होणार आहे. महाराष्ट्रासाठी बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

या कार्यक्रमाची नागपूर शहर आणि परिसरात जय्यत तयारी सुरु आहे. उद्घाटन सोहळ्याच्या परिसरात शिंदे-फडणवीस यांचे मोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. या सोहळ्याला अनेक मंत्री-आमदार आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहतील.नागपूर रेल्वे स्टेशनची ऐतिहासिक वास्तू सजावण्यात आली आहे. रविवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होईल. यावेळी ते नागपूर-विलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.

शिर्डीतही भव्य तयारी करण्यात आली आहे. इंटरचेंजच्या ठिकाणी विशाल असे सभामंडप उभारण्यात आले आहे. विकासगंगा आली हो अंगणीययय अशा मजकुराचे भव्य बॅनर्स शिर्डीत लावण्यात आले आहेत. त्यावर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या वंदे भारत रेल्वेला हिरवी झेंडी दाखवली जाणार आहे. यामुळे नागपूर स्टेशनवरही रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. समृद्धीचा झिरो माईल ते वायफळ टोल नाकापर्यंत भव्य सजावट करण्यात आली आहे. नागपूरमध्ये सुमारे १० किलोमीटरपर्यंत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाचे झेंडे फडकवण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com