Maharashtra Rain : महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट; चार दिवस पावसाचा इशारा

Maharashtra Rain : महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट; चार दिवस पावसाचा इशारा

महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट आले आहे. राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पिकांचे नुकसान झाले होते.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात १५ आणि १६ मार्च रोजी अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय.

आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज मराठवाड्यातही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उन्हाळी पिकासह फळ भागांना देखील या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com