Rain Update : राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Rain Update : राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्यात तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातून परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात झाली नसून मध्य महाराष्ट्रासह कोकणात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विदर्भासह राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून राज्यातील परतीच्या पावसाबद्दल 15 ऑक्टोबरपर्यंत स्पष्ट होण्याचे संकेत देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या तीन दिवसांत दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांतून म्हणजेच सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com