Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम राहणार, 'या' जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम राहणार, 'या' जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने (Rainfall) जोरदार बॅटींग केली आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) सखल भागांत पाणी साचले आहे. तसेच, पावसाचा जोर कायम राहिल्यास पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

राज्यात आजही पावसाचा (Rain Update) जोर कायम राहणार असून मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने (Rainfall) जोरदार बॅटींग केली आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) सखल भागांत पाणी साचले आहे. तसेच, पावसाचा जोर कायम राहिल्यास पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच हवामान विभागाकडून मुंबईसाठी (Mumbai) पुढील २ दिवस सतर्कतेचे इशारा देण्यात आला आहे. शिवाय रायगड (Raigad), रत्नागिरी (Rantnagiri), पालघर (Palghar), पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur), नाशिक (Nashik) आणि गडचिरोलीला (Gadchiroli) आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, मुंबई, सातारा, मराठवाड्याचा काही भाग आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम राहणार, 'या' जिल्ह्यात रेड अलर्ट जारी
OBC Reservation : ओबीसी आरक्षण आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

पुणे - गेल्या 6 दिवसांपासून सतत पाऊस पडतोय. पुण्यात सतत पडणाऱ्या पावसाने खडकवासला धरण 75 टक्के भरलं आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय.

नाशिक - जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरातील पहिली ते बारावीच्या सगळ्या शाळा आज बंद राहणार आहे. नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केल्यानं प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. गोदावरी नदीला मोसमातील पहिला पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झाले आहे.

धुळे - जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अक्कलपाडा धरणातून दोन हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून पांझरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम राहणार, 'या' जिल्ह्यात रेड अलर्ट जारी
Satara Rain : सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; जनजीवन विस्कळीत

पालघर - जव्हार, मोखाडा तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय. जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथील नदीला मोठा पूर आलाय. आठ गावांचा संपर्क तुटला आहे.

नंदुरबार - हवामान खात्याने दिलेल्या इशारा नंतर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. तर नवापूर तालुक्यातील शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तालुक्यातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. गोमाई, शिवण, नागन,नदी काठावरील. गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नवापूर शहरातील रंगावली काठावरील 100 घरातील 400 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

गडचिरोलीत पुढचे दोन दिवस रेड अलर्ट

मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीची पाहणी करण्यात आली असून गडचिरोली जिल्ह्यात 12 आणि 13 तारखेला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील 48 तासात गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रात्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीची पाहणी करुन बैठक घेतली. काल पावसाचा जोर कमी झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com