आज शिंदे गटाचं चिन्ह ठरणार; शिंदे गटाला 'हे' चिन्ह मिळण्याची शक्यता
राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड गोंधळ सुरु आहे. अशातच शिवसेना आणि शिंदे गटामध्ये पक्षाच नाव आणि चिन्हावरून जोरदार घमासान सुरु आहे. अशातच काल उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्य वतीनं काल निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या गटाला आता 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव मिळाले आहे तर या उद्धव ठाकरे यांच्या गटाचे चिन्ह मशाल असणार आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. मात्र, यावेळी शिंदे गटाला निवडणूक आयोगाने धक्का देत आणि शिंदे गटाचे तिन्ही चिन्ह आयोगाने नाकारलं. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्य वतीनं काल निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
आज शिंदे गट आज तीन नवे पर्याय देणार असून त्यापैकी एक चिन्ह त्यांना मिळणार आहे. यावर आता निवडणूक आयोग याबद्दल काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना आणि शिंदे गटाने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये तीन पैकी दोन निवडणूक चिन्ह हे एक सारखे असल्याचे समोर आले होते. शिवसेना एकनाथ शिंदे गटाला आज 'गदा' चिन्ह मिळण्याची शक्यता आहे.