ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे
पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला.
राज्यात मागील काही महिन्यांपासून प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. त्यातच आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अवघ्या सर्व देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर मोठा निर्णय दिला आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस एमआर शाह, जस्टिस कृष्ण मुरारी, जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस पीएस नरसिम्हा यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.