अडीच वर्षात मविआने मोठे निर्णय घेतली
आमचं काम पाहता मविआ प्रयोग फसला म्हणणं हे राजकीय अज्ञान
गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. करोना संकटावर मात करण्यासाठी आरोग्य खात्यानं उत्तम कामगिरी केली, हे सर्व पाहिल्यानंतर हा प्रयोग फसलाय म्हणणं, याचा अर्थ राजकीय अज्ञान आहे. विधानसभेचे सभासद इथे आल्यानंतर, त्यांना ज्या पद्धतीनं नेलं ती सर्व वस्तुस्थिती लोकांना सांगतील, त्यानंतर बहुमत सिद्ध होईल – शरद पवार
राष्ट्रवादी मुख्यमंत्री ठाकरेंना शेवटपर्यंत पाठिंबा देणार
राज्यातील परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहोत
आघाडी सरकार टिकवण्याची आमची भूमिका
निधीवरून माझ्यावर आरोप होत आहेत
अडीच वर्षात निधीला कुठेही काटछाट केली नाही
निधीबाबत कुठलाही दुजाभाव केला नाही
राऊतांनी अगोदर 25 वर्ष मविआ सरकार टिकेल असं म्हटलं होतं
आमदारांना परत आणण्यासाठी राऊतांनी तसे वक्तव्य केले असावे
सर्वांनी मिळून ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवलं
महाविकास आघाडीला कॉंग्रेसचं समर्थन कायम
भाजपला रोखण्यासाठी आम्ही आजही मविआसोबत
संजय राऊतांच्या वक्तव्यावर कॉंग्रेसच्या बैठकीत चर्चा
मविआ सरकार 5 वर्ष कायम राहील
कॉंग्रेस कायमच मविआसोबत राहणार
भाजपनेच हा भूकंप घडवून आणला
सरकार पाडण्यासाठी भाजपची कारस्थानं
घरचे दरवाजे उघडे आहेत, संजय राऊत यांची बंडखोरांना पुन्हा ट्विटद्वारे साद 'चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र!' असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
चर्चेतून मार्ग निघू शकतो.
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 23, 2022
चर्चा होऊ शकते.
घरचे दरवाजे उघडे आहेत..
का उगाच वण वण भटकताय?
गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ!
जय महाराष्ट्र!
शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी सांगितलेला अनुभव धक्कादायक आहे !
— Nana Patole (@NANA_PATOLE) June 23, 2022
सत्तेसाठी भाजपा खालच्या पातळीवर जाऊन हवी तशी गुंडगिरी करत सुटले आहेत!
जिथे हे आमदारांची अशी अवस्था करतात तिथे सर्व सामान्य जनतेचे काय हाल करतील ? #Maharashtra#MVA
शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात कोणताही सच्चा शिवसैनिक कदापि अविश्वास दाखविणे शक्य नाही.
— Subhash Desai (@Subhash_Desai) June 23, 2022
सत्ता येते, सत्ता जाते, सत्तेची चिंता नसते
सत्तेतून कुणी बाहेर पडलं तरी नवं नाही
मविआशी चर्चा करून विधानं करा
प्रत्येक पक्षामध्ये कुरबुरी असतात
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मजबूतीने उभा
गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली नाही
सरकार गेल्यानंतर विरोधी बाकावर बसावं लागेल त्यात नवीन नाही
शिवसेनेला आमदार किती आहेत याची सध्या चिंता करण्याची गरज नाही
वर्षा सोडून मातोश्रीवर जाण हा ठाकरेंचं व्यक्तिगत निर्णय
उध्दव ठाकरे आजही मुख्यमंत्री आहेत
रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे गटाची बैठक संपली, या बैठकीत सर्व आमदारांनी मिळून शिंदेंसोबतच पुढचा लढा द्यायचा असा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
ही आहे आमदारांची भावना... pic.twitter.com/U6FxBzp1QG
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022
देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपची खलबतं, सागर बंगल्यावर खासदार आमदारांच्या गाठीभेटी, प्रसाद लाड, जयकुमार रावल, अभिमन्यू पवार, श्रीकांत भारतीय सागर बंगल्यावर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयातील सर्व सचिवांना साडे बारा वाजता ऑनलाईन संबोधित करणार, राज्याचे मुख्य सचिव, अतिरिक्त सचिव, प्रधान सचिव उपस्थित राहाणार, या व्यतिरिक्त इतर सचिवही उपस्थित राहाणार
ठाकरे साहेबांच्या बरोबर राहावं आणि त्यांना सरकार करण्यासाठी प्रयत्न करावेत. ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले शिवसेनेचे आमदार परत येतील, असा आम्हाला विश्वास आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत असल्यामुळे त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांना पूर्ण पाठिंबा राहील, असे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले.
सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू. @CMOMaharashtra @mieknathshinde
— Deepali Sayed (@deepalisayed) June 23, 2022