Maharashtra Political Crisis LIVE : शिवसैनिकांचा उद्रेक, मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयावर शिवसैनिकांची दगडफेक

Maharashtra Political Crisis LIVE : शिवसैनिकांचा उद्रेक, मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयावर शिवसैनिकांची दगडफेक

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. एकनाथ शिंदे गट त्यांच्या मागण्यांवर ठाम आहे, तर शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना मुंबईत येऊन बोलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, या आवाहनला एकनाथ शिंदेंनी नाकारलं आहे. आता यापुढे काय होणार हे पाहाणं महत्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्व राजकीय घडामोडींचे (Maharashtra Political Crisis) अपडेट्स जाणून घ्या...

शिवसेना आमदार दिलीप लांडे यांचे चांदीवली मध्ये लागलेले बॅनर्स शिवसैनिकांनी फाडले 

शिवसैनिकांचा उद्रेक, मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयावर शिवसैनिकांची दगडफेक

मुख्यमंत्री राज्यातील पीक पाण्याचा आढाव घेत आहे,  राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बरोबर मुख्यमंत्री चर्चा करत आहे 

अर्जून खोतकरांवर ईडीचा कारवाई

महाविकास आघाडी म्हणून राहिले, तर ही त्यांची शेवटची आमदारकी असेल - उदयनराजे

राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी - अजित पवार 

शरद पवार आणि अजित पवार सहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर येणार आहेत

मोह सोडलाय, जिद्द नाही' उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांशी संवाद 

'मला वाटल सीएमपदाची खूर्ची हलतेय मात्र...', बंडखोर आमदारांना मुख्यमंत्र्यांचा टोला

सांगली शिवसेनाही एकनाथ शिंदेंच्या बंडात सामील,जिल्हा प्रमुखाने जयंत पाटलांच्यावर गंभीर आरोप करत शिंदेंना दिले समर्थन 

खून दिया है जान भी देंगे उद्धव साहब तुम्हारे लिये, मुख्यमंत्र्यांच्या समर्थकाने लिहीले रक्ताने पत्र

खून दिया है जान भी देंगे उद्धव साहब तुम्हारे लिये:- शिवसैनिक

भडगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रक्ताने माखलेला पत्र लिहा आम्ही तुमच्या सोबत आहोत असा पाठिंबा दर्शवला आहे

त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना घेऊन महाराष्ट्रात परत यावं यासाठी त्यांना देखील शिवसैनिकांनी रक्ताने माखलेल पत्र लिहिले आहे.

शिवसेना भवनात शिवेसेनेची महत्त्वाची बैठक, आदित्य ठाकरे थोड्याच वेळात सेनाभवनात पोहोचणार 

आदित्य ठाकरे मातोश्रीवरुन शिवसेनाभवनाकडे रवाना, खासदार, नरसेवकांसोबत बैठक 

मुंबईतील सर्व नगरसेवकांना शिवसेना भवनात बोलवलं, सायंकाली साडे सात वाजता नगरसेवकांची तातडीची बैठक

एकनाथ शिंदे गुवाहाटीच्या हॉटेलमधून बाहेर पडले, कामाख्या देवीच्या दर्शनाला जात असल्याची माहिती

शिवसेनेचे कायदेशीर पथक विधानभवनात पोहोचलं, 12 आमदारांच्या निलंबनासाठी सेना आक्रमक

आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भुपेन कुमार बोराह यांनी एकनाथ शिंदे व बंडखोर आमदारांना पत्र लिहिले आहे आणि लवकरात लवकर आसाम मधून परत महाराष्ट्रात जाण्याची विनंती केली आहे. 

नाशकात एकनाथ शिंदे समर्थकांनी लावलेला बॅनरवर शिवसैनिकांनी फासले काळे 

नाशिक: एकनाथ शिंदे समर्थकांनी लावलेला बॅनरवर शिवसैनिकांनी फासले काळे, पोस्टरवर काळे फासले तसेच अंडे फेकले, नाशिकमध्ये एकनाथ शिंदे समर्थक आणि शिवसैनिक आमने-सामने, बंडखोर शिवसैनिक आणि शिवसैनिक यांच्यात वाद वाढण्याची शक्यता

महाविकास आघाडीचं सरकार मजबूत असून पुढील अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल,शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास...

शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली झालेली महाविकास आघाडी सरकारची बैठक संपली

त्यांनी आम्ही परत येण्याची संधी दिली, आता वेळ निघून गेलीये -संजय राऊत 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com