Maharashtra Political Crisis : वर्षा सोडतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले भावूक
मुख्यमंत्री वर्षा निवासस्थान सोडले
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी वर्षा निवासस्थान सोडले आहे. ते मातोश्रीकडे जाण्यास निघाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारी निवासस्थान वर्षा बंगला सोडला आहे. ते तिथून मातोश्रीकडे रवाना झाले आहेत. यावेळी उपस्थित सर्व ठाकरे कुटुंबियांना डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते. उद्धव ठाकरेही यावेळी भावूक झाले होते. त्यामुळे शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या संघर्षाला आता भावनिक रुप आल्याचं पाहायला मिळतंय.
गुलाबराव पाटील गुवाहाटीला पोहोचले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात वर्षा निवासस्थान सोडणार
शरद पवारांनी कोणताही सल्ला दिला नाही, संजय राऊतांचं स्पष्टीकरण
वर्षा बंगल्याचा मोह उद्धव ठाकरेंना नाही, ते मातोश्रीवर राहायला जाणार : संजय राऊत
एकनाथ शिंदे यांनी दोन नवीन ट्विट केले आहेत
उद्धव ठाकरे आठ वाजता मातोश्रीवर जाणार, उद्धव ठाकरेंच्या जंगी स्वागताची तयारी सुरू, वांद्रे-वरळी सी-लिंकजवळ स्वागतासाठी शिवसैनिक सज्ज
आज रात्री 8 वाजता शिवसैनिकांचं शक्तिप्रदर्शन, मातोश्रीवर जमण्याचं पदाधिकाऱ्यांना आवाहन
शिंदेंनी लिहिलेल्या पत्रावरील सही माझी नाही, नितीन देशमुखांचा दावा
सरकार वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, शरद पवारांचा सल्ला
शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये बैठक, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड वर्षावर दाखल
शरद पवार वर्षा बंगल्यावर दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live
मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवलं
मुख्यमंत्री पदी राहायची माझी इच्छा नाही
या क्षणाला मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे - मुख्यमंत्री
प्रशासनाचा अनुभव नसताना लढलो - मुख्यमंत्री
2014 च्या निवडणूकीत बिकट परिस्थितीतही 64 आमदार निवडून आणले - मुख्यमंत्री
सेना आणि हिंदुत्व दूर होऊ शकत नाही - मुख्यमंत्री
बंडखोरांनी सांगाव मी राजीनामा देतो- मुख्यमंत्री
COVID मध्ये मी सर्व काही प्रामाणिक पणाने केलं
मी माझी पहिली कॅबिनेट बैठक हॉस्पिटल पारपडली
हिंदुत्व हा आमचा श्वास आहे
हिंदुत्वाबदल बोलणार मी पहिला सीएम
बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहे
माझा मुकाम मोतोश्रीला हलवत आहे
माझ्या लोकांना माझा मुखमंत्रीपद नको आहे
मी देतो राजिमा, गायब झालेल्या आमदारांनी येऊन माझे हे पत्र राजपाल कडे घेऊन जाव
मी पद सोडला की शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहिजे
असे त्या आमदारांनी येऊन सांगाव
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी ५ वाजता फेसबूक लाईव्ह द्वारे महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधणार.
शरद पवार आणि कमलनाथ यांची भेट
शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलवलं
शिंदे गटाकडून शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती
यापुढे सहकार्य राहू द्या - मुख्यमंत्री
मला उमेदवारी दिली असती तर हे झालं नसतं - संभाजीराजे
शिवसेनेच्या बैठकीस उपस्थित न राहिल्यास स्वच्छेने पक्षाचं सदस्यत्व सोडा, शिवसेनेचा शिंदेंना शेवटचा इशारा
जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेला मोठी खिंडार, मंत्री अन् सर्व आमदार फुटले, आमदारापाठोपाठ मंत्री गुलाबराव पाटील हे सुध्दा एकनाथ शिंदेच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती
भाजपच्या मदतीशिवाय आमदारांचे अपहरण शक्य नाही - संजय राऊत
मविआ सरकार बरखास्त होणार का ? काही क्षणात मोठा निर्णय
मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीत ऑनलाईन उपस्थित, मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक सुरु, मविआ सरकार बरखास्त होणार का ? काही क्षणात मोठा निर्णय
माझा घातपात करण्याचा प्रयत्न झाला; आमदार नितीन देशमुख यांचा गंभीर आरोप
उध्दव ठाकरे यांना कोरोनाची लागण - नाना पटोले
राष्ट्रवादीचे १५ आमदार अजित पवारांच्या कार्यालयात
मुख्यमंत्री राजीनाम्याच्या तयारीत, राष्ट्रवादीचे १५ आमदार अजित पवारांच्या कार्यालयात, सुनील शेळके - (आमदार मावळ) ,सरोज अहिरे- (आमदार नाशिक) , धनंजय मुंडे - (आमदार परळी) , संदीप क्षीरसागर - (आमदार बीड) , अतुल शेठ बेणके - (आमदार जुन्नर) , अशोक पवार - (आमदार शिरुर)