सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, 29 ऑगस्टला पुढील सुनावणीची शक्यता

सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, 29 ऑगस्टला पुढील सुनावणीची शक्यता

राज्यातील सत्तासंघर्षावर (गुरुवारी 25 ऑगस्टला ) होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. या प्रकरणावर आता सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. पण सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा निवृत्त होत आहेत. त्यामुळं महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण आता नव्या सरन्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणीसाठी येईल.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्यातील सत्तासंघर्षावर (गुरुवारी 25 ऑगस्टला ) होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. या प्रकरणावर आता सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. पण सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा निवृत्त होत आहेत. त्यामुळं महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण आता नव्या सरन्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणीसाठी येईल.

सरन्यायाधीश एस व्ही रमणा हे या 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी महाराष्ट्राचेच न्यायमूर्ती उदय लळित हे सरन्यायाधीश होणार आहेत. गुरुवारी पाच न्यायमूर्तींचे खंडपीठ गठीत होऊन निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबद्दल निर्णय देणे अपेक्षित होतं. पण अद्याप या घटनापीठाची रचना नाही. या आधीही ही सुनावणी चार वेळेला पुढे ढकलली गेली आहे.

सरन्यायाधीश एस व्ही रमणा यांनी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपावलं होतं, आणि या प्रकरणी गुरुवारी सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. सरन्यायाधीशांनी दिलेल्या निर्देशानंतरही हे प्रकरण अद्याप कामकाजाच्या यादीत समाविष्ट नाही.

सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, 29 ऑगस्टला पुढील सुनावणीची शक्यता
पुणे एक्सप्रेस वेवर आज ट्रॅफिक ब्लॉक, जाणून घ्या कसा असेल मार्ग!
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com