Maharashtra Political Crisis : फडणवीस नेतृत्व करण्यास तयार; गोव्याच्या मुख्यमंत्र्याचे वक्तव्य

Maharashtra Political Crisis : फडणवीस नेतृत्व करण्यास तयार; गोव्याच्या मुख्यमंत्र्याचे वक्तव्य

राज्यापालांना कोरोना झाला असताना महाराष्ट्राचा कारभार गोव्याच्या राज्यपालांकडे जाणार असल्याच्या शक्यता आहे. अशात गोव्याच्या मुख्यमंत्र्याचे वक्तव्याला महत्व
Published on

पणजी : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात शिवसेनेतून (Shivsena) इन्कमिंग सुरुच आहे. यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले असून लवकरच एकनाथ शिंदे सत्तास्थापनेसाठी लवकरच दावा करणार असण्याची शक्यता आहे. तर, भाजपची (BJP) सत्ता येणे गरजेचे असल्याचे वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी केले आहे.

प्रमोद सावंत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र राज्यातील राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवून आहे. फडणवीस असे नेतृत्व करण्यास तयार असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची सत्ता येणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे वेळ मागितली होती. परंतु, राज्यपालांना कोरोना झाला असून ते रुग्णालतात अॅडमिट आहेत. यामुळ माहाराष्ट्राचा कारभार गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्याकडे जाण्याची आहे. यामुळे एकनाथ शिंदेही श्रीधरन यांच्याकडे दावा दाखल करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, वर्षा बंगल्यात आमदारांना कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. बडव्यांनी आपल्यापर्यंत कधी येऊ दिले नाही. आम्हाला अयोध्येला का जाऊ दिले नाही. आम्हाला प्रवेश नाही पण काँग्रेस, राष्ट्रवादीला तुम्ही भेटत होते. काल आमच्या प्रश्नांना उत्तरेच दिली नाही, अशा प्रश्नांचा भडीमार करत औरंगाबादचे आमदार संजय शिरसाठ यांनी मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहीले आहे. उद्धव ठाकरे यांना लिहिलेले हे पत्र एकनाथ शिंदे यांनी टि्वट केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com