Shambhuraj Desai
Shambhuraj DesaiTeam Lokshahi

महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगाव दौरा पुढे ढकलला - शंभूराज देसाई

महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांचा सीमा प्रश्नावरुन राजकारण चांगलेच तापले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांचा सीमा प्रश्नावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांचा सीमा प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील बेळगाव दौरा करणार होते. मात्र तो दौरा त्यांनी पुढे ढकलला आहे.

आज, पत्रकार परिषदेत शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी दौरा पुढे ढकलला आहे. आमचा सीमाभागात जाण्याचा दौरा होता. याबाबत आम्ही कर्नाटक सरकारला कळवले होते. बेळगावमधील गावात जाऊन त्याच्याशी चर्चा करणार होतो.कर्नाटक सरकारने सीमेवर मोठा बंदोबस्तही लावला. कर्नाटकचे मुख्यमंत्रीही कारवाईची भाषा करू लागले होते. हे चुकीचं असून भारतातील कुठलाही व्यक्ती इतर राज्यात जाऊ शकतो. आज महापरिनिर्वाण दिनी जाऊन कुठेही या कार्यक्रमाला गालबोट लागू नये यासाठी दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com